Beed dist @news
• प्रेमचंद यांचे विचार आजही प्रासंगिक— प्रा.सुभाष गांगर्डे
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
जागतिक कीर्तीचे हिंदी साहित्यिक थोर स्वतंत्र सेनानी कहानी व उपन्यास सम्राट मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेले असुन , त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार आज ही प्रासंगिक असल्याचे प्रतिपादन आष्टी (जिल्हा बीड) येथील पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष गांगर्डे यांनी व्यक्त केले . आष्टी येथील भगवान महाविद्यालयामध्ये आयोजित प्रेमचंद जयंती कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते .३१ जुलै २०२४ रोजी जागतिक कीर्तीचे हिंदी साहित्यिक मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त येथील भगवान महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ तर , प्रमुख वक्ते म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सुभाष गांगर्डे हे उपस्थित होते . यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य हे मंचावर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प़ारभी मुंशी प्रेमचंद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख डॉ. आप्पासाहेब टाळके यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी प्रेमचंद यांच्या संघर्षशील वैयक्तिक व सामाजिक जीवनावर भाष्य केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम संयोजक प्रा. श्रीरंग पवार यांनी केले तर , उपस्थिताचे आभार जयश्री बोडके यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदी विभाग उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव वैद्य, प्रोफेसर दिगंबर पाटील, प्रा. श्रीकांत धोंडे, प्रोफेसर बाबासाहेब झिने व डॉ. नामदेव वाघुले यांचे विशेष सहकार्य लाभले असून , याप्रसंगी कनिष्ठ / वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
