Home Breaking News Chandrapur city@News • चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिन साजरा! •...

Chandrapur city@News • चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिन साजरा! • कार्यक्रमाला अधिका-यांसह व कर्मचारी बांधवांची उपस्थिती !

26

Chandrapur city@News
• चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने महसूल दिन साजरा!

• कार्यक्रमाला अधिका-यांसह व कर्मचारी बांधवांची उपस्थिती !

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज महसूल दिन साजरा करण्यात आला.
राज्य शासनाच्या दि. ३०/७/२०२४ च्या परिपत्रकानुसार महसूल विभागातर्फे राज्यात ‘महसूल दिन’ हा 1 ऑगस्ट पासून
“महसूल सप्ताह “म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

आज या महसूल सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते झाला.महसूल दिनाचे औचित्य साधत एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महसूल दिन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार उपस्थित होते . आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश धात्रक यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख संचालन महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अजय मॅकलवार यांनी केले.