Home Breaking News Wardha dist @news •गुणवंत विध्यार्थीयांचा समाजसेवक डॉ.उमेश वावरे यांनी केला सत्कार ...

Wardha dist @news •गुणवंत विध्यार्थीयांचा समाजसेवक डॉ.उमेश वावरे यांनी केला सत्कार •समाज व देशाचा सुयोग्य नागरिक होऊन प्रगती कराचा दिला संदेश.

118

Wardha dist @news
•गुणवंत विध्यार्थीयांचा समाजसेवक डॉ.उमेश वावरे यांनी केला सत्कार

•समाज व देशाचा सुयोग्य नागरिक होऊन प्रगती कराचा दिला संदेश.

सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनीधी, वर्धा

समुद्रपूर स्थानिक एकलव्य अनु माध्यमिक आश्रम शाळा व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) वायगाव (गोंड) तहसील समुद्रपूर येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात एक सामाजिक कर्तव्य आणि समाजाला सुशिक्षित नागरिक मिळण्याकरिता प्रोत्साहन मिळावे म्हणून समाजसेवक डॉ. उमेश वावरे यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी यांना मेडल व शिल्ड प्रदान केले.
या प्रसंगी बोलताना शिक्षण हे माणसाला उच्च स्तरावर नेते हे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

या वेळी विद्यार्थी यांनी त्यांचा पण सन्मान केला आणि त्यांच्या जीवनपट सांगताना हिंघणघाट सारख्या शहरातून एक मिल मजुराचा मुलगा ते विदेशात संशोधन करणारे डॉक्टर बनून प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी समाजा समोर एक आदर्श बनून दाखवला तसेच आजही सामाजिक जाणीव म्हणून भारतात परत येऊन समाजाची सेवा करत आहे हे त्यांचे चरित्र मांडले या प्रसंगी महाविद्यालय मधल्या प्राचार्या नरसापूरकर कामडी मॅडम व देशमुख ,मोरे , चाफके, भालशंकर,शकील, निनावे, पांगुळ, शेळकर, गोटे, गावंडे, मसराम, देवडे, चौधरी, बागडे, तिमांडे, अर्चना ठाकरे तसेच महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी गण उपस्थित होते.