Home Breaking News Wardha Dist@News •लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस...

Wardha Dist@News •लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महापुरुषांच्या विचारांचे पुस्तक वाटप

43

Wardha Dist@News
•लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महापुरुषांच्या विचारांचे पुस्तक वाटप

सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा:निंबोली पुनर्वसन येथे ध्वजा रोहन करून अल्पोहार मार्गदर्शन कार्यक्रम तर मायबाई वार्ड कसबा येथे शेकडो नागरिकांच्या उपस्थित जल्लोषात जयंती साजरी

आर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचार, च्या पुढाकारात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद शहारे सूचनेनुसार आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात आर्वी विधानसभा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आलेत, तसेच कार्यक्रमात सहभागी होत महापुरुषांच्या विचाराचे वाटप पुस्तक वाटून करण्यात आले, यावेळी रोजगार स्वयंरोजगार वर्धा जिल्हाध्यक्ष रेखा वानखेडे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर तालुका अध्यक्ष अरुणराव उंमरे दिनकर कोयरे व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सकाळी दहा वाजता निंबोली पुनर्वसन येथे निंबोली येथील गावकरी, नागरिक व अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायी द्वारा आयोजित केलेल्या 104 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित झाले यावेळी गावकऱ्यांच्या नागरिकांच्या आयोजकाच्या उपस्थित दीप प्रज्वलित करून विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक अनिल काळे, समाज भूषण पुरस्काराने सन्माननीत राजेशजी अहिव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश प्रधान,अरुणभाऊ गेडाम,धीरेन्द्रजी शेंडे, अश्विनजी शेंडे, प्रवीण कदम, राजू भगत, अमोल शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती निंबोली येथील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल खंडारे, लहुजी शक्ती सेनेचे अमित खंडारे, अमित खडसे, अमर बोरघे, पियुष खंडार, अक्षय खंडारे, शिवदास खडसे, संजय कोकर्डे, सचीन इरपाचे, विलास इरपाचे, आर्यन भगत,प्रथमेश भगत, यांनी परिश्रम घेतले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने महापुरुषांच्या पुस्तकाचे वितरण सर्व मान्यवरानी विद्यार्थी विद्यार्थिनी व गावाकऱ्याना केले, त्यानंतर आर्वी येथील मायबाई वॉर्ड कसबा येथील जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांनी हजेरी लावत विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आल, यावेळी मंचावर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा शीतल गायकवाड,प्रा. राजेश सोळंकी,समाजाचे तरुण नेतृत्व मंगेश प्रधान, कमलेश लोखंडे,केदार लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोराकर, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, सामाजिक न्याय च्या अर्चना धवणे, प्रवीण वानखडे, अरुण लांडगे, विशाल वानखडे, राहुल प्रधान, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव प्रधान, यावेळी अंजली प्रधान स्वरा गायकवाड, विहान प्रधान, भावेश गायकवाड, नयन प्रधान यां चिमुकल्यानी अतिशय चांगल भाषण केल त्यासाठी त्यांचा राष्ट्रवादी कडून पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेत तर महिलांनी समाजाचे उथानासाठी पुढाकार घ्यावा आम्ही सोबत आहोत हे सांगणाऱ्या पोलीस भरतीची तय्यारी सुरु असलेल्या कोमल साबळे आणि खासगी शाळेत शिक्षक म्हणून असलेल्या मोनाली लांडगे यांचा सुद्धा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले