Home Breaking News ⚪🌀💠सण श्रावण सरींचा !

⚪🌀💠सण श्रावण सरींचा !

195

⚪🌀💠सण श्रावण सरींचा !

गेल्या खोलवर तडा अश्या भुईला
वाट पाहुनी दमला चातक तान्हा
थेंब पावसाचा धरेवर पडताच बघा
समद्या नदी नाल्यांना फुटला पान्हा
!!१!!

आला सण श्रावण सरींचा
निसर्ग असा अद्भुत चित्रकार
चाहूल पाऊस सरींची लागता
सुखावला सगळा चराचर
!!२!!

घेती आस्वाद निसर्गाचा पर्यटक
हिरवीगार वसुंधरा चहुकडे
वाहे डोंगर माथ्यातुनी धबधबे
पाणीच पाणी जिकडे तिकडे
!!३!!

लागला कृषक शेत जोतण्यास
लावूनी वखर – नांगरांना धार
हिरव्या गवताची खुराक बैलांस
जुंपली बैलजोडी जणू श्रीमंताची थार
!!४!!

श्रावणात पारंपारिक सणांचा उत्सव
वृद्ध चिमुकल्यांत हर्षाची लाट
चणे – फुटाणे लाह्या गोपाळकाला
तर कधी पेढ्यांचा चमचमीत ताट
!!५!!

वर्षानुवर्ष सुरू हे निसर्गाचे चक्र
त्यात वर्णावी किती श्रावणाची महती
घेऊन येई संग आनंद – आल्हाद
त्याची ऋणी सदा मनुष्य अन धरती
!!६!!

💠🌀💠मुक्ता आगडे pk सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
मूल,चंद्रपूर ⚪💠