Home Breaking News Varora taluka @News • वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रकोप •...

Varora taluka @News • वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रकोप • बळीराजा संकटात

126

Varora taluka @News
• वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रकोप
• बळीराजा संकटात

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा:आठवड्याभरापासून सतत- धार पावसामुळे सोयाबीन कपाशी या पिकांची वाताहत होत.नदी नाल्याला लागलेल्या शेतीमधील शेती बुडाली पिके नष्ट झाली त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे यामध्ये तालुक्यातील काही क्षेत्रातील सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे हाती येणारे नगदी पीक आपल्या हातातून जाणार की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे कृषी विभागांनी ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर उंट अळीने अटॅक केला आहे अशा नुकसानकारक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाने करून त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी पिडित शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील जामगाव बुर्ज येथील शेतकरी प्रशांत ताजणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्यामुळे शेतकरी पुरता खतला असून चिंताग्रस्त झाला आहे गेल्या आठवड्याभर्या पासून सततधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकाची वाताहत होत असताना परत एकदा सोयाबीन या पिकावर लष्करी अळी आल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे मागील वर्षी येलो मोजाक या रोगाने थैमान घातले होते यामध्ये सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सोयाबीन पिकांचे प्लॉटच्या प्लांट उद्ध्वस्त झाली होती.शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळाली नाही अजूनही शेतकरी शासन दरबारी पायपीट करीत आहेत आता पुन्हा उंट अळीने डोके वर काढलेले असून सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.या अळ्यांच्या प्रादुर्भावने बळीराजा प्रचंड दहशतीत असून हाती आलेले पीक जाणार तर नाही ना या विविचणेत शेतकरी दिसून येत आहे संबंधित कृषी विभागाने यावर उपाययोजना करावी अशी मागणी जामगाव येथील शेतकरी प्रशांत ताजणे यांनी केली आहे.