Beed dist @news
•माजी.आ.भिमराव धोंडे यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल-
•बोगस मतदारांची पडताळणी सुरू —
सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
आष्टीत बनावट मतदार नाव नोंदणी होत असल्याची तक्रार माजी आ. भिमराव धोंडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती . याची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून नव्याने नोंद झालेल्या मतदारांपैकी संशयित बोगस वाटणारे मतदारांची पडताळणी सुरू केली .
अधिक माहिती अशी की , शुक्रवारी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी बोगस मतदार नोंदणीबाबत केलेल्या तक्रारीची माहिती घेण्यासाठी व विविध कामांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयास भेट देऊन , वेगवेगळ्या विभागात जाऊन कामाची पाहणी केली. माजी आमदार भिमराव धोंडे यांनी चार दिवसांपूर्वी बनावट मतदार नाव नोंदणी बाबत राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती . त्याबाबत तहसिलदार गायकवाड यांना भेटून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , आपल्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली असुन तक्रारी प्रमाणे संशयित वाटणाऱ्या व नव्याने नोंद झालेल्या मतदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असून , काही संशयास्पद नांवे आढळली आहेत .
सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बीएलओ) यांनी या बाबींची खातरजमा करूनच अर्जाची पडताळणी करावी , वरील बाबीकडे दुर्लक्ष झाल्यास व चुकीची मतदार नोंदणी किंवा वगळणी झाल्यास सर्वस्वी बीएलओ जबाबदार राहतील असे तहसीलदार गायकवाड यांनी सांगितले .
माजी आ. भिमराव धोंडे यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, व तहसीलदार आष्टी यांच्या कडे तक्रार केली होती . तसेच माजी आमदार भीमराव धोंडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत किती अर्ज दाखल झाले आहेत याचीही सविस्तर माहिती घेतली असून ,
पिक विमा , संजय गांधी निराधार योजना, घरकुल या योजनांची माहिती घेतली . त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एकुण ३६६६० महिलांनी अर्ज दाखल केले असून , उर्वरित पात्र असणारी एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे तहसीलदारांना सांगितले . तसेच मतदारसंघातील सर्व पात्र महिलांनी आपापल्या तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फाॅर्म भरण्याचे आवाहन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले आहे .
