Home Breaking News Ballarpur taluka@ News • मुंबईत बामणी प्रोटीन्स कंपनी सुरु करण्यासाठी बैठक

Ballarpur taluka@ News • मुंबईत बामणी प्रोटीन्स कंपनी सुरु करण्यासाठी बैठक

275

Ballarpur taluka@ News
• मुंबईत बामणी प्रोटीन्स कंपनी सुरु करण्यासाठी बैठक

सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- बामणी प्रोटीन्स कंपनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली.
मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंगल वैद, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अविनाश ढाकणे, आणि बामणी प्रोटीन्सचे कामगार प्रतिनिधी देवराव निंदेकर, दिनेश गोंदे, निखील निंदेकर, नितीन सोनुले उपस्थित होते.

केरळ औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मेनन आणि बामणी प्रोटीन्स चे अन्य संचालक दूरदृष्य प्रणालीद्वारेै सहभागी झाले होते.

हा कारखाना सुरू राहण्यासाठी शासनाचे आवश्यक ते पूर्ण सहकार्य मिळेल असे प्रतिपादन या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानुसार कंपनीने लगेच योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासनही या बैठकीत दिले आहे. या बैठकीमुळे बामणी प्रोटीन्सचा प्रश्न सकारात्मकरित्या आणि गतीने सुटेल असा दिला विश्वास आहे.