Home Breaking News Ballarpur taluka@ News • बल्लारपूर भाजपा तालुक्याची महीला मोर्चा संघटनात्मक बैठक पार...

Ballarpur taluka@ News • बल्लारपूर भाजपा तालुक्याची महीला मोर्चा संघटनात्मक बैठक पार पडली! बैठकीला अनेकांची उपस्थिती!

519

Ballarpur taluka@ News
• बल्लारपूर भाजपा तालुक्याची महीला मोर्चा संघटनात्मक बैठक पार पडली!

• बैठकीला अनेकांची उपस्थिती!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर: बल्लारपूर शासकीय विश्रागृहात
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा तर्फे आयोजित बल्लारपूर तालुकास्तरीय संघटनात्मक बैठक पार पडली. ना.सुधीर मुनगंटीवार यांचे सूचनेनुसार व वनविभाग महामंडळ माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल यांच्या नेतृत्वात चंद्रपूर(ग्रामीण) भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात भाजपा महिला संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.. केंद्र व राज्य शासना तर्फे रविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना घरोघरी पोहोचविण्या करिता महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पुढाकार घ्यावा व पक्ष बळकट करण्याकरिता सूक्ष्म नियोजन करावे.अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह,कु.अल्का आत्राम विद्याताई देवाडकर,
जिल्हा अध्यक्ष वंदना शेंडे,नीलम सुरमवार, अर्चना जिवतोडे, रक्षिता निरंजने,शहर अध्यक्ष वैशाली जोशी,वर्षा संचुवार,आरती आक्केवार, कांता ढोके, प्रामुख्याने उपस्थित होते. या शिवाय सुवर्णा भटारकर, सारिका कनकम,ममता बोज्जा, दिपमाला यादव, नजमा खान,सुरेखा श्रीवास्तव ,संध्या मिश्रा, सुनीता निवलकर, उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन जयश्री मोहुर्ले यांनी केले.