Home Breaking News Chandrapur dist@ News • अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे येत्या ५ सप्टेंबरला चंद्रपूरात जेलभरो...

Chandrapur dist@ News • अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे येत्या ५ सप्टेंबरला चंद्रपूरात जेलभरो आंदोलन ! • प्रा.रमेशचंद्र दहीवडे करणार आंदोलनाचे नेतृत्व! • हजारों अंगणवाडी सेविका होणार या आंदोलनात सहभागी!

29

Chandrapur dist@ News
• अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे
येत्या ५ सप्टेंबरला चंद्रपूरात जेलभरो आंदोलन !
• प्रा.रमेशचंद्र दहीवडे करणार आंदोलनाचे नेतृत्व!
• हजारों अंगणवाडी सेविका होणार या आंदोलनात सहभागी!

चंद्रपूर :किरण घाटे

अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करा ,किमान वेतन २६०० हजार रुपये देण्यात यावे , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करा आदिं मागण्यांच्या संदर्भात येत्या ५सप्टेंबरला चंद्रपूरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहीवडे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान दिली.सदरहु आंदोलन हे अभूतपूर्व राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

शासन आश्वासन देते पण त्या आश्वासनांची पूर्तता करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

ह्या रास्त मागण्यां पदरात पाडुन घेण्याकरिता व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परत एकदा रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले.

या पूर्वी झालेल्या आंदोलना पेक्षा हे आंदोलन भव्य दिव्य राहील असे प्रा.दहीवडे यांनी यावेळी सांगितले.