Home Breaking News Chimur taluka@ News • काॅंग्रेसचे दिग्गज नेते गुलाबराव डोंगरे यांची प्राणज्योत मालवली!

Chimur taluka@ News • काॅंग्रेसचे दिग्गज नेते गुलाबराव डोंगरे यांची प्राणज्योत मालवली!

110

Chimur taluka@ News
• काॅंग्रेसचे दिग्गज नेते गुलाबराव डोंगरे यांची प्राणज्योत मालवली!

चंद्रपूर :किरण घाटे

नेरी(चिमूर) :चिमूर तालुक्यातच नव्हे तर अख्खा चंद्रपूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे दिग्गज नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गुलाबराव रामचंद्र डोंगरे यांचे आज अल्पशा आजाराने दुपारी ५ वाजून १३मिनिटांनी त्यांच्या नेरी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ८८वर्षाचे होते.
शेवट पर्यंत ते काँग्रेस पक्षात राहिले .पक्षात काम करतांना त्यांनी पक्ष मजबूती साठी अधिक मेहनत घेत पक्षात अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी प्रवेश दिला.स्थानिक निवडणूका लढवितांना त्यांचा सदैव पुढाकार राहिला !
एवढेच नाही तर त्यांचे अनेक सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था व व्यापारी मंडळाशी निकटचे संबंध राहिले!
महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंचे सदस्य संजय डोंगरे यांचे ते वडील होत.
दिवंगत गुलाबराव डोंगरे यांना महाराष्ट्रातील सहज सुचलं परिवार व किरणदिप व्हाॅट्सअप गृपची भावपूर्ण श्रद्धांजली!