❗❕श्रावण सरी ❗❕
सौ.शैला चिमड्यालवार
सहज सुचलं काव्यकुंज सदस्य सावली जिल्हा- चंद्रपूर
श्रावण सरी येता
वसुंधराही भिजली
आली आनंद पर्वणी
धरा सुंदर बहरली….
मेघ धावती नभांगणी
सरीवर सरी ओघळती
पाना फुलांच्या सौंदर्याने
हिरवा निसर्ग शोभती…..
सुगंध दरवळ चाफ्यांचा
चंचल पाखरू भ्रमंती
श्रावण सर सर धरीत
क्षितिजापासुनी मन धावती….
आली सणांची मांदियाळी
श्रावण शिवामूठ सोमवार
वाहू शंकराला बेलपान
करुनी आरती कर्पूर…..
सप्तरंग इंद्रधनूची कमान
रिमझिम सर गंध ओला
श्रावण रंग अलग अलग
निसर्गरम्य ताटवा फुलला….