Chandrapur city@ News
•मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :यंग चांदा ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहीनींच्या मदतीसाठी पुढे आले : तब्बल पाच हजार अर्ज “त्यांनी “यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून भरले !
चंद्रपूर :किरण घाटे
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेचे फार्म महिलांना भरुन देण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शहरातील महिलांचे आता पावेतो तब्बल पाच हजार पेक्षा अधिक फार्म भरल्याची माहिती यंग चांदा ब्रिगेड महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वंदना हातगांवकर यांनी काल चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान दिली.
सदरहु योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कळते .


