Home Breaking News Chandrapur taluka@ news • फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे जि. प. शाळेला व्हाईट...

Chandrapur taluka@ news • फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे जि. प. शाळेला व्हाईट बोर्ड भेट

146

Chandrapur taluka@ news
• फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे जि. प. शाळेला व्हाईट बोर्ड भेट

सुवर्ण भारत :शंकर महाकाली(संपादक)

चंद्रपूर:- फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप अध्यक्ष सरिता मालू यांनी व्हाइट बोर्ड भेट दिनांक 15 ऑगस्ट 2024 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पायली येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढून राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
सर्व मान्यवर, नागरिक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात विद्यार्थी तथा प्रमुख अतिथी ने मार्गदर्शन केले. फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप द्वारे शाळेला आवश्यक असलेले दोन व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले. फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप च्या अध्यक्षा सरिता मालू आणि करण कोलागुरी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते गणेश इसनकर, हेमा व्यास, मीना जोया तसेच ग्राम पंचायत पायली भटाळी चे सदस्य नदीम रायपुरे, शारदा मेश्राम, आणि शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष इंदू रामटेके सह मोठ्या संख्येने गावातील नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक निखिल तांबोळी यांनी तर आभार प्रदर्शन सहा. शिक्षिका सौ अंजलीना साळवे यांनी केले.