Home Breaking News Chandrapur city@ News • विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली...

Chandrapur city@ News • विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. प्रतिभा धानोरकरांची भेट

208

Chandrapur city@ News
• विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खा. प्रतिभा धानोरकरांची भेट

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची चंद्रपूर कार्यालयात विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक अधिवक्ता विजय मोगरे यांच्या नेतृत्वात, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ संजय बेले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नामदेव वरभे, महिला अध्यक्ष चंदा वैरागडे, चंद्रपूर शहर अध्यक्ष अभय घटे, मनीष खनके ,जेष्ठ विधितज्ञ् ॲड. वासुदेव खेळकर, अधिवक्ता टिपले, ॲड.अनिरुद्ध टिकले, प्रा .डॉ .सुभाष गिरडे, डॉ .अभय बुटले, ॲड .प्रवीण पिसे, दिक्षात बेले यांनी सदिच्छा भेट घेतली.

भेटी दरम्यान त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निर्वांचन क्षेत्रात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे परंतु स्वातंत्र्य नंतरही तेली समाजाचा पाहिजे तसा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास झालेला नाही.
याकरिता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विदर्भ तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाकारिता सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व बहुसंख्य असलेल्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी व शिष्टमंडळाला दिले. यावेळी तेली समाजाचे अन्य मान्यवर उपस्थित होते.