Home Breaking News •गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने रविवारी होतोय चंद्रपूरात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार! •कार्यक्रमाला...

•गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने रविवारी होतोय चंद्रपूरात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार! •कार्यक्रमाला राहणार अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती !

39

•गोल्ला -गोलकर -गोलेवार समाजाच्या वतीने रविवारी होतोय चंद्रपूरात गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार!
•कार्यक्रमाला राहणार अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती !

चंद्रपूर:किरण घाटे

गोल्ला- गोलकर- गोलेवार समाजाच्या वतीने येत्या १८ऑगस्टला चंद्रपूर शहरात समाजातील गुणवंत विद्यार्थी तथा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सपत्नीक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या आयोजित कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

चंद्रपूर जटपूरा स्थित पंच तेली हनुमान मंदिरातील सभागृहात हा कार्यक्रम दुपारी ११वाजता आयोजित करण्यात आला असून सदरहु कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे जेष्ठ सदस्य मनोहर कोपूलवार,चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार सचिव महेश मॅकलवार,संघटक प्रविण भिमनवार कोषाध्यक्ष क्रिष्णाजी दाऊवार, कार्यकारणी सदस्य विवेक गुडलावार,विलास दंडिकवार यांनी केले आहे.