Home Breaking News Ballarpur city@ News •आम आदमी पक्षा तर्फे मेणबत्ती लाऊन कोलकाता हत्याकांडाच्या निषेध

Ballarpur city@ News •आम आदमी पक्षा तर्फे मेणबत्ती लाऊन कोलकाता हत्याकांडाच्या निषेध

67

Ballarpur city@ News
•आम आदमी पक्षा तर्फे मेणबत्ती लाऊन कोलकाता हत्याकांडाच्या निषेध

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :देशात सतत घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहत महिलांच्या मनात भिती तसेच चीड भावना निर्माण होत आहे. अश्यावेळी शिवरायांची सर्व स्त्रियांना आठवण होते. शत्रूच्या घरच्या स्त्रियांनादेखील आई-बहिणींसमान मानणाऱ्या त्या विचारांची आज गरज आहे. असा विचार व्यक्त करत आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर महिला आघाडीने शिवरायांना राखी अर्पण करून कोलकाता महिला डॉक्टर हत्याकांडातील आरोपींना फासावर चढविण्यात यावे. व अश्या आरोपींसाठी कठोर कायदा व्हावा अशी मागणी आप तर्फे करण्यात आली.

अश्या घटना पुन्हा पुन्हा घडू नये याकरिता देशातील केंद्र सरकार तसेच देशातील राज्य सरकार याकडे लक्ष घातले पाहिजे असे देखील आपतर्फे मागणी करण्यात आली.

यावेळेस शहर महिला अध्यक्ष किरण खन्ना, संगीता तोडे, प्रिया झामरे, स्नेहा गौर, मयुरी तोडे, अनिता करमनकर, बुशरा शेख, रेखा भोगे, निशा नंदवंशी, तसेच सर्व महिला कार्यकर्ते व शहराध्यक्ष रवि पुप्पलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली व गणेश सिलगमवार, संघटनमंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ शेख, मनीषा अकोले, गणेश अकोले, सौरभ चव्हाण, सहील सह कार्यकर्ते  उपस्थित होते.