Home Breaking News Ballarpur City@ News • एम.जे.एफ. कॉलेज च्या खेळाडूची चंद्रपूर पोलीस मध्ये निवड

Ballarpur City@ News • एम.जे.एफ. कॉलेज च्या खेळाडूची चंद्रपूर पोलीस मध्ये निवड

74

Ballarpur City News
• एम.जे.एफ. कॉलेज च्या खेळाडूची चंद्रपूर पोलीस मध्ये निवड

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर येथील बी.ए ची विद्यार्थिनी अर्सिया सरवर खान पठाण हिची निवड चंद्रपूर पोलीस मध्ये झालेली आहे . त्या निवडीबद्दल तिचे स्वंतत्र दिवस १५ ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन व सत्कार केले.
ट्रेनिंग नंतर अर्सियाची नियुक्ती चंद्रपूर जिल्हा पोलीस मध्ये होणार आहे , करिता सर्व स्तरातून तिचे कौतुक करण्यात येत आहे . आपल्या उद्बोधनात लायब्ररीमध्ये जाणे आणि ग्राउंड नियमित सुरू ठेवणे याबद्दल तिने स्वतः सांगितले . तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर, उपाध्यक्ष राजू चिताडे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. डी. चव्हाण तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.