Home Breaking News ……..अखेर मूलचा तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे निलंबित ! कारवाईसाठी लोकहितचे जिल्हा...

……..अखेर मूलचा तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे निलंबित ! कारवाईसाठी लोकहितचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी केला होता सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा!

428

……..अखेर मूलचा तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे निलंबित !
• कारवाईसाठी लोकहितचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी केला होता सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा !

चंद्रपूर:किरण घाटे

मूल : पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नागपूरचे महसूल आयुक्त तसेच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कडे राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली होती. दरम्यान या प्रकरणात सखोल चौकशी होवून मूलचे तालूका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.

समर्थ यांनी नागपूरचे महसूल आयुक्त यांच्या कडे याच प्रकरणाच्या अनुषंगाने सदरहु कृषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती.या मागणी बाबत समर्थ यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवलेला होता हे विशेष!