Ballarpur City @News
•बदलापूर अत्याचार घटना -शिवसेनाच्या वतीने बल्हारपूरात निदर्शने !
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपूर: बल्लारपूर तालुका शिवसेना (उध्दव बाळसाहेब ठाकरे) गटाच्या वतीने बल्लारपूर शिवसेना कार्याल्या समोर निदर्शने करण्यात आले.
बदलापूर मध्ये चार वर्षीय दोन चिमुरड्या लहान मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेच्या संदर्भात राज्य सरकारचा धिक्कार करण्यात आला. नराधमाला फाशी द्या
आणि महीलांना सुरक्षा द्या यासाठी काल बल्हारपूर शहरात आंदोलन करण्यात आले .
यावेळी माजी नगरसेवक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, महिला जिल्हाप्रमुख कल्पना गोरखोटे, बल्लारपूर तालुका प्रमूख प्रकाश पाठक, शहर प्रमुख
बाबा शाहू, माजी नगर सेविका रंजीता बिरे, तालूका संघटक महिला मिनाशी गलगट,शहर समन्वयक ज्योति गहलोत,वैष्णवी लिचोडे,अंजली बेनबंसी,
विनोद बुराडे ,प्रभाकर मुरकुटे, सुनिता राजुरकार – उपसरपंच,व शिवसेना पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.