Home Breaking News Korpna taluka News •अंगणवाडी सेविकांचा तहसील कार्यालयावर धडक

Korpna taluka News •अंगणवाडी सेविकांचा तहसील कार्यालयावर धडक

95

Korpna taluka News
•अंगणवाडी सेविकांचा तहसील कार्यालयावर धडक

सुवर्ण भारत:मनोज गोरे
प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपणा: तालुक्यातील अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन आज 21 ऑगस्ट रोज बुधवार ला सकाळी अकरा वाजता अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, पेन्सल देण्यात यावा, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी देण्यात यावी, आधी मागण्या घेऊन तसेच शासनाने अंगणवाडी सेविकांना अनेक कामे त्यांच्याकडून करून घेत आहेत मात्र त्यांना त्याचा मोबदला दिल्या जात नाही.

       सरकारच्या विरोधात नारेबाजी देत अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याला निवेदन दिले. 5 सप्टेंबरला चंद्रपूर येथेच जेलभरो कार्यक्रम होईल अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सतत चालू ठेवणार असल्याचे मत यावेळी अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केले.