Ghugus city News

•भारत बंदच्या समर्थनार्थ घुग्घुस शहरात कडकडीत बंदच्या चांगलाच प्रतिसाद
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्घुस:सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात उपवर्गिकरण करून क्रिमिलियरची अट लावण्याच्या निर्णयाचा विरोधात भारत भर अनुसूचित जाती जमातीच्या समाजबांधवांवर अन्याय केला त्यामुळे त्या निर्णयाच्या विरोधात दिनांक २१ ऑगस्टला भारत बंदची हाक दिल्या गेली होती त्याच्या समर्थनार्थ घुग्घुस शहरातील अनुसूचित जाती,जमाती यांच्या सबोतच आम आदमी पार्टी,काँग्रेस पक्षाने समर्थन देण्यात आले.तसेच
शहरातील दुकाने,भाजीपाला मार्केट बंद ठेऊन घुग्घुस शहरातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
सकाळी पासून अनुसूचित जाती जमातीच्या युवकांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन नवनियुक्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातील संपूर्ण बाजारपेठ दुचाकी रॅली काढून संपूर्ण शहर बंद करण्यात आले. घुग्घुस पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकला निवेदन देण्यात येत माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती त्यांच्या आरक्षणांमध्ये जो निर्णय दिला त्यामुळे समाज समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आमच्यवर झालेल्या अन्यायाविरोधात आपली भावना व्यक्त करण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, सर्वधर्म समभाव पक्षाचा एकत्रित येऊन,वतीने माननीय राष्ट्रपती यांना यांच्यामार्फत मागण्याचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बौद्ध सर्कल समितीचे अध्यक्ष आयु.भिमेंद्र कांबळे,महासचिव श्याम कुमरवार,आम्रपाली बुध्द विहार कमिटीचे अध्यक्ष अशोक (बंडू) रामटेके,काँग्रेस शहर अध्यक्ष राजु रेड्डी,आपचे अध्यक्ष अमित बोरकर, आदिवासी भिवसेन व नवएकता जयसेवा बहुउद्देशीय सेवा मंडळचे गणेश उईके,दिपक पेंदोर, ललित आत्राम,बौद्धीसत्व मैत्री संस्थेचे अमृत सोदारी,बालाजी पतंगे,संदीप वासेकर,वंचित आघाडीचे अध्यक्ष शरद पाईकराव,सर्व घुग्घुस सर्कलचे जगन्नाथ पराजें,प्रियंका धूपे,उर्मिला लिहितकर,योगिता मुन,सरोज पाझारे,पुनम कांबळे,अमित मानकर,संजोग वाघमारे,अभिषेक मंजगभळी निषेध सभा घेण्यात आली होती.
मनोगत भिमेंद्र कांबळे, श्याम कुमरवार,उर्मिला लिहितकर,उषाताई आगदारी,महेश जुमनाके,नागेश पथाडे,सैय्यद अनवर यानी प्रकट केले.सूत्रसंचालन सुजित सोनटक्के यांनी केले होते.
