Home Breaking News • कार्यगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले सेवाभावी डॉ.स्वप्निल शिंदे

• कार्यगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले सेवाभावी डॉ.स्वप्निल शिंदे

96

• कार्यगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले सेवाभावी डॉ.स्वप्निल शिंदे

पुणे :विशेष प्रतिनिधी

काव्यमित्र संस्था,पुणे यांचा वतीने सलग 24 व्या वर्षी आयोजित आचार्य अत्रे व बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती निमित्त डॉ. स्वप्निल अनिल शिंदे यांच्या सामाजिक,शैक्षणिक, साहित्यिक, औद्योगिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी तारांगण ऑडीटोरीयम, सायन्स पार्क, पिंपरी चिंचवड येथे डॉ.पंडित विद्यासागर माजी कुलगुरू यांच्या हस्ते बहाल करण्यात आला.सदरहु

कार्यक्रमाचे उद्घाटक व्ही.जे. वाघमारे ,प्रमुख पाहुणे, निमंत्रक हरिनाथ कांबळे, स्वागतोउत्सुक गजानन उफाडे, प्राचार्य अनिल शिंदे,व काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विमालाई श्रीमंत सागर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.