Mul Taluka @News
• जानाळा- मंदिर तोडफोड प्रकरणाची तातडीने चौकशी करा -दत्तात्रय समर्थंची मागणी!
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जानाळा येथील मुळ रहिवाशी तथा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका, नागपूरच्या सुपरिचित समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या शेतजमीनीत असलेल्या भुतेश्वर महादेव मंदिराची तोडफोड करुन नुकसान केल्या प्रकरणात लोकहितचे दत्तात्रय समर्थ यांनी आपला आवाज बुलंद केल्या नंतर चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयांनी तहसिलदार मूल व पोलिस निरीक्षक मूल यांना चौकशी करण्याचे लेखी पत्र नुकतेच दिले आहेत!
दरम्यान याच प्रकरणाच्या अनुषंगाने समर्थ यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार सादर केल्याचे वृत्त आहेत.
संबंधित प्रकरणात निःपक्षपाती चौकशी होवून योग्य न्याय मिळावा अशी मागणी समाजसेविका मायाताई कोसरे व लोकहितचे दत्तात्रय समर्थ यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या पूर्वीच केली होती.
