Home Breaking News Ghugus News News •भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे ६ वे त्रिवार्षिक अधिवेशन...

Ghugus News News •भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे ६ वे त्रिवार्षिक अधिवेशन संपन्न •नवनियुक्त भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष विवेक अल्लेवार

256

Ghugus News News
•भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे ६ वे त्रिवार्षिक अधिवेशन संपन्न

•नवनियुक्त भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष विवेक अल्लेवार

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा, प्रतिनीधी

घुग्घुस : प्रयास सभागृहात २४ ऑगस्ट रोजी भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे ६ वे त्रैवार्षिक अधिवेशन थाटात संपन्न झाले.याप्रसंगी भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्विपजलीत करण्यात आले.तसेच भगवान विश्वकर्मा व संस्थापक देत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण,अभिवादन करुन उद्घाटक महामंत्री भा.म.स.वि.प्र.नागपूर गजानन गटलेवार,अध्यक्ष भा.म.स.चंद्रपूर बंडू हिवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचे पण स्वागत,सत्कार करण्यात आले.

घुग्घुस येथील नवनियुक्त भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष विवेक अल्लेवार यांची निवड करण्यात आले.तसेच लाॅयड्स मेटल्स कामगार कर्मचारी स्थायी,अस्थायी मित्रांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला.तसेच समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रमुख उपस्थिती माजी अध्यक्ष विदर्भ प्रदेश नागपूर रमेश बल्लेवार,भा.म.स.जिल्हामंत्री चंद्रपूर पवन ढवळे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले.

याप्रसंगी भा.म.स.उपाध्यक्ष नागपूर, प्रमोद येलचलवार,अ.भा.इ.अँन्ड मे.महा.संघ मंत्री विठ्ठल ठाकरे,भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.