राज्यातील अत्याचारांच्या वाढत्या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूरात महाविकास आघाडीचे निदर्शने!
चंद्रपूर :किरण घाटे
राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारचा चंद्रपूर येथील गांधी चौकात निषेध करण्यात आला.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे,काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामु तिवारी, माजी चंद्रपूर जि.प.अध्यक्ष प्रकाश मारकवार ,काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत दानव तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते.
