Home Breaking News सुपरिचित कवयित्री सुनिता महाजन यांना साहित्यरत्न पुरस्कार घोषीत !

सुपरिचित कवयित्री सुनिता महाजन यांना साहित्यरत्न पुरस्कार घोषीत !

85

सुपरिचित कवयित्री सुनिता महाजन यांना साहित्यरत्न पुरस्कार घोषीत !

चंद्रपूर:किरण घाटे

महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा साहित्यरत्न पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पूर्वच्या प्रख्यात कवयित्री सुनिता अरविंद महाजन यांना घोषीत झाला आहे.

आज रविवारला मुंबई स्थित नॅशनल लायब्ररी वांद्रे सभागृहात हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या सुनिता महाजन ह्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आयोजकांना कळविले आहे .

सध्या त्या माॅरिशसच्या दौऱ्यावर असल्याचे त्यांनी आज एका संदेशातून या प्रतिनिधीस सांगितले.

कवयित्री महाजन यांना साहित्यरत्न पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे ,अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय किरणदिप व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार ,सावलीच्या सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार,स्मिता बांडगे ,उज्वला नगराळे,भावना खोब्रागडे ,कु.मंगल मिसाळ, वैशाली राऊत, मुग्धा अगडे,आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.