Home Breaking News Bhamhpuri taluka News •बजरंग दलातर्फे दहीहंडी स्पर्धा उत्साहात साजरी

Bhamhpuri taluka News •बजरंग दलातर्फे दहीहंडी स्पर्धा उत्साहात साजरी

52

Bhamhpuri taluka News

•बजरंग दलातर्फे दहीहंडी स्पर्धा उत्साहात साजरी

सुवर्ण भारत: शंकर महाकाली( संपादक) 

ब्रम्हपुरी – विश्व हिंदू परिषदेच्या 60 व्या स्थापना दिना निमित्य बजरंग दल ब्रम्हपुरी तर्फे भव्य दही हंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सौ. भारती दिवाकर निकुरे, अश्विन उपासे राष्ट्रवादी , नोगेश बघमारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी , मनोज वठे भाजप तालुका महामंत्री , अरविंद नंदुरकर शहर प्रमुख भाजप, सुयोग बाळबुद्धे भाजयुमो, रश्मी पेशाने ई.उपस्थित होते.

स्पर्धेसाठी विदर्भातील अनेक चमुंनी सहभाग नोंदविला होता. यात प्रथम पारितोषिक 61,111 रुपये श्री दिवाकर निकुरे युवा नेता राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तर्फे विजेता चमू राधे कृष्णा ग्रुप मोठी दिघोरी ता. लाखांदूर यांना प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक बजरंग दल ब्रम्हपुरी मार्फत 31,111 रुपये विजेता चमू कर्चूला बाईज मोठी दिघोरी ता. लाखांदूर यांना बाळूभाऊ नंदुरकर, मनोज वठे, सुयोग बाळबुद्धे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमात ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहून सहभाग नोंदविला.दही हंडी फोडतानाचे दृश्य आपल्या मोबाईल मधे कैद करण्याची स्पर्धा युवकांमध्ये दिसून आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षनीय होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ललित उरकुडे यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून गणेश लांजेवार, सुयोग बाळबुद्धे उपस्थित होते.

बजरंग दल ब्रम्हपुरी च्या वतीने आयोजक श्री संतोष भंडारकर प्रखंड संयोजक, सौरभ सोनटक्के, गणेश धंजुळे, प्रज्वल निकुरे,श्रेयश गवाकर, कृष्णा मेहेर, पार्थ लोणारे, पवन वणीकर, दीपक कावळे,हिमांशू कापसे, शंतनू ठीकरे, पूनव कामडी, कृष्णा खरवडे,आदित्य लोखंडे ई. यांनी विशेष मेहनत घेतली