Home Breaking News Bhadravti taluka news • नाभिक समाजाचे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन. •...

Bhadravti taluka news • नाभिक समाजाचे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन. • ३० सप्टेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन

75

Bhadravti taluka news
• नाभिक समाजाचे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन.
• ३० सप्टेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन

सुवर्ण भारत✍️राजेश येसेकर भद्रावती

भद्रावती : राज्यातील नाभिक समाजाच्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यासाठी व सलुन व्यवसायांवर वारंवार होत असलेल्या अपमानास्पद घटना मुंबई या विषयावर विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल नाभिक समाजाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन खंबीर नेतृत्व म्हणजे किरण भांगे यांच्या नेतृत्वाखाली पुकारले आहे.या आंदोलनात महाराष्ट्रातील विविध समाज संघटनांनी आप आपला पाठिंबा जाहीर देऊन एकत्र येऊन सहभागी होणार आहे.

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे श्री.संत सेना महाराज केस शिल्पी बोर्ड तत्काळ स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे आणि त्यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा इतर संचालक मंडळाची नियुक्ती करावी या मागणीसाठी आंदोलनात आपण समाजांचा भाग म्हणून जाहीर पाठिंबा तसेच महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज बांधवांनी व सलुन व्यवसाईकांनी व राज्यातील सर्व नाभिक समाज संघटनेने व तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संघटनेने एकजूट होऊन मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन हीच वेळ आहे. आपली ताकद दाखवून दाखवावी.असे गणेश वनकर सचिव नाभिक युवा क्रांती महाराष्ट्र राज्य व सलुन ब्युटि पार्लर असोसिएशन चंद्रपूर म्हणाले