Ballarpur City News
• बल्लारपूर शहरातील चौकात सी.सी.कॅमेरे लावा:उमेश कुंडले
सुवर्ण भारत: पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर
बल्लारपूर:शहरातील चोरीचे प्रमाण वाढत असल्या मळे बल्लारपूर शहारात विविध चौका मधील कॅमेरा लावण्याकरिता मनसे शहराध्यक्ष उमेश कुंडले यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनातून मागणी करण्यात आली.
बल्लारपूर शहरात भर दिवसाआड गाडिया चोरीचे प्रमाण वाढत असून काही बेरोजगार युवा पिढी दारुड्या यांचा खिशातिल पैसे काढणं नुकतेच एक हफ्त्या आधी कल्लामंदिर ७ नंबर गेट इथे भारदिवसा आडे, उभ्या ट्रकची बॅटरी चोरी झाली व कायद्याचा धाक नसून काही गुन्हेगारी लोकांना धाक नाही.त्या मुळे बल्लारपूर शहरातील या आधी पण सी.सी. कॅमेरे बसवण्यात आले होते व त्याचे मेन्टॅन्स नसल्यामुळे काही भागातील कॅमेरे चोरी गेले असून आता नव्याने काही ठिकाणी तात्काळ सीसी कॅमेरा बसवण्यात यावे.
लावण्यात येणारे स्थळ पेपर मिल ७ नो गेट,कलामंदिर,काद्र्या मस्जिद,काट्टा गेट,बालाजी कॉम्प्लेक्स,नवीन बस्टॉप,नगरपरिषद चौक,रेल्वे चौक,पुराणा बस्टॉप,फॉरेस्ट गेट,
पत्ता गोदाम,BTS प्लॅट,गुरुनानक कॉलेज, बामणी टी पॉईंट,गोलपूिया(आतून बाहेरून),गांधी चौक,साथनाल चौक,
वेकोली ग्राऊंड, (युको बँक जवळ),कारवा रोड,
विसापूर रोड असा विविध ठिकाणी सीसी कॅमेरे लावण्यात यावे. यावेळी मनसे शहराध्यक्ष उमेश कुंडले,कृष्णा रापेलीवार,मोहन राजभर, प्रशांत बानकर,राजेश कोणपत्तीवार,आदी उपस्थित होते.




