Chandrapur City News
• अन् शालेय विद्यार्थीनींच्या चेह-यावर हास्य फूलले!
• चंद्रपूरात तब्बल 2002मुलींना सायकल वाटप !
सुवर्ण भारत: किरण घाटे(संपादक)
चंद्रपूर:चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि आपल्या संकल्पनेतून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत, शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, 2002 शाळकरी मुलींना सायकल वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थिंनीं कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमस्थळी सर्व गरजूवंत विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.
याच क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहण्यासारखे होते.
दरम्यान पुढील आयुष्यासाठी त्यांना उपस्थित मान्यवरांनी अनंत शुभेच्छा दिल्या!
आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार व मनपा आयुक्त विपिन पालीवाल उपस्थित होते.
