Home Breaking News Mul taluka News •मूल बाजारपेठ आज पूर्णता बंद ! शाळा, रुग्णालये...

Mul taluka News •मूल बाजारपेठ आज पूर्णता बंद ! शाळा, रुग्णालये व बस सेवा सुरु! •ठिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त •काल रात्री घडली मूल नगरीत रक्तरंजित घटना ! एका अठरा वर्षीय मुलाचा मृत्यू !

92

Mul taluka News

•मूल बाजारपेठ आज पूर्णता बंद !
शाळा, रुग्णालये व बस सेवा सुरु!
•ठिक ठिकाणी पोलिस बंदोबस्त
•काल रात्री घडली मूल नगरीत रक्तरंजित घटना !
एका अठरा वर्षीय मुलाचा मृत्यू !

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीत काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एक रक्तरंजित घटना घडल्या नंतर आज सोमवारी सर्व पक्षीय व काही सामाजिक संघटनांनी मूल बंदची हाक दिली.
दरम्यान आज सकाळी ११वाजता मूल नगरीला या प्रतिनिधी भेट दिली असता संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याचे दिसून आले .
उपरोक्त घटना ही काल रात्री दहा वाजता घडली असून या खूनी हल्ल्यात प्रेमचंद कामडी नावाचा १८वर्षिय मुलगा जागीच मृत पावला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारार्थ तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मूल शहरातील बाजारपेठ बंद असून रुग्णालये ,शाळा,बॅंका व बससेवा सुरू आहे .
शहरात ठिकठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
खूनी हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी येथील स्थानिक जनतेची मागणी आहे.