Home Breaking News Ballarpur City News • बल्लारपूर पोलिसांनी देशी बनावटी दोन पिस्तूल ...

Ballarpur City News • बल्लारपूर पोलिसांनी देशी बनावटी दोन पिस्तूल केली जप्त • ३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

84

Ballarpur City News

• बल्लारपूर पोलिसांनी देशी बनावटी दोन पिस्तूल  केली जप्त

• ३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बल्लारपूर: बल्लारपूर पोलिसाची मोठी कारवाई १४/१०/२०२४ चे रात्री दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवर आकाश चाफले, वय २४ वर्ष, प्रणय जुनघरे, वय २३ वर्ष, बावरी यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव बाफले याचे ताब्यातून कायदेशिररिती प्रमाणे एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटी सारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) सात.एम.एम. पिस्तूल किंमत २५,०००/- रू. घटनास्थळ जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करून पो स्टेला अप क ९५९/२०२४ कलम ७, २७ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. सदर ची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन , सहाय्यक अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु,दिपक साखरे, सहाय्यक उपविभागिय पोलीस अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. टोपले, पोलीस.उपनिरिक्षक हुसेन शहा, गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पोलीस अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, अंमलदार अनिता नायडू, तसेच विकास खंदार, इत्याड़ी पोलीस. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.