Home Breaking News नागपूरात कविसंमेलन थाटात संपन्न!

नागपूरात कविसंमेलन थाटात संपन्न!

93

नागपूरात कविसंमेलन थाटात संपन्न!

नागपूर :किरण घाटे

झाडीबोली साहित्य मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा वाढदिवस तदवतचं झाडीबोली साहित्य मंडळाच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नागपूरात कविसंमेलन पार पडले . सदरहु कविसंमेलनाचे आयोजन”बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठान”
खापरी येथील शिव इलाईट टाऊनशिप क्लब हाऊस मध्ये करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मो. बा. देशपांडे लाभले होते तर उद्घाटक म्हणून वर्षा देशपांडे उपस्थित होते.याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उषा राऊत ह्या उपस्थित होत्या .या वेळी त्यांना गुलाबपुष्प, शाल श्रीफळ, आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.
सरोज अंदनकर यांच्या आवाजात सरस्वती स्तवन झाले
उद्घाटनपर भाषणानंतर
कार्यक्रमाच्या आयोजक
सरोज अंदनकर यांनी प्रास्ताविक भाषणातून झाडीबोली विषयी माहिती देऊन
आ. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ! कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा डांगे यांनी केले .

या कविसंमेलनाकरिता खास शुभेच्छा पाठवल्या त्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा.उज्वलाताई अंधारे यांनी अमेरिकेवरून! या शिवाय चंद्रपूर वरुन रंजना अनिल काटकर
यांनी शुभेच्छा पाठवल्या!
निमंत्रित कवी विकास गजापुरे, अशोक कांबळे,सुचिता पाटील, हरिदास गौतम, डॉ. गीता वाळके ,हितेश गोमासे, राहुल गवस यांनी आपल्या कविता सादर केल्या
त्या सर्व कवींना सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.अनेक श्रोत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती.
सदरहु कार्यक्रमाला संजय अंदनकर,श्रीराम अंदनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शेवटी
विकास गजापुरे यांनी सर्वांचे आभार मानले.