Home Breaking News • भद्रावती तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले निवेदन.

• भद्रावती तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले निवेदन.

9

• भद्रावती तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले निवेदन.

सुवर्ण भारत: राजेश येसेकर

भद्रावती तालुका, प्रतिनिधी

भद्रावती : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ होते आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहे. शहरात सात वर्षिय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच घडली या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आली. त्याला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीला घेऊन गोंडी धर्मि आदिवासी एकता संघटने तर्फे निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
भद्रनाग मंदिराच्या प्रांगणातुन मोर्चा निघाला.

यावेळी गोंडी धर्मीय एकता संघटनेचे अध्यक्ष तथा आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी पिडीत मुलीचे शिक्षण व संगोपनाची तरतूद राज्य शासनाने करावी पिडीत मुलीच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य द्यावे यासोबत अनेक मागण्या शासनापुढे ठेवण्यात आल्या भद्रनाग मंदिराच्या प्रांगणातुन निघाला बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार मुख्य मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयात धडकला तिथे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले.

आपल्या अपयशावर पांघरुन घालण्यासाठी पोलीस प्रशासन हे अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी केला. यापुढे आदिवासीच नव्हे तर कोणत्याही महिलांवर अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. असा इशारा देण्यात आला.

या मोर्च्यात डॉ प्रवीण येरणे, महादेव सिडाम, संदीप नैताम, पिंटु मरस्कोल्हे, ऑड. प्रमोद गेडाम, गोलु गेडाम, पिंटु मडावी, पुरब सिडाम, भास्कर तुमराम, संजय मसराम,सुरेश मडावी, निरंजन आत्राम, चिंतामण आत्राम, पत्रुजी आत्राम, पुष्पा मंगाम, वनिता परचाके, विध्या किनाके, अनिता गेडाम, शितल गेडाम,शुभांगी मेश्राम, सुनिता खंडाळकर,माजी. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे आदी उपस्थित होते.