Home Breaking News • बल्लारपूर शहरात पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार – ना.मुनगंटीवार

• बल्लारपूर शहरात पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार – ना.मुनगंटीवार

147

• बल्लारपूर शहरात पवन कल्याण यांच्या नावाने ‘कल्याण मंडपम्’ उभारणार – ना.मुनगंटीवार

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपुरातील तेलगू बांधवांनी देशाची सेवा केली. तेलगू बांधवांच्या कल्याणासाठी मलाही तेलगू साहित्य अकादमीची स्थापना करता आले. मंदिर निर्माण करता आले. सामाजिक सभागृह उभारता आले. तेलगू बांधवांच्या संघटनेसाठी खूप काम केले आणि पुढेही करणार आहे. आता पवन कल्याण यांच्या नावाने बल्लारपुरात ‘कल्याण मंडपम्’ उभारणार आहे, अशी घोषणा ना. मुनगंटीवार यांनी केली. त्याचवेळी पवन कल्याण यांच्या आगमनाने व सभेत हजारों संख्येने उपस्थित तेलगू समाजाच्या आशीर्वादाने माझा विजय सुनिश्चित झाल्याची भावनाही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.