Home Breaking News भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करण्याची आम आदमी पार्टी तर्फे निवेदनातून...

भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करण्याची आम आदमी पार्टी तर्फे निवेदनातून मागणी

210

भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करण्याची आम आदमी पार्टी तर्फे निवेदनातून मागणी

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती : – भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी वेळेवर होत नसल्यामुळे रक्त तपासणी अहवाल मिळण्यास ४ ते ५ दिवसांचा विलंब होतो. यामुळे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत याचा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर परिणाम होत आहे.

या समस्येवर उपाय म्हणून आम आदमी पार्टीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात त्वरित पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात यासंदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

आम आदमी पार्टीची मागणी:

1. भद्रावती ग्रामीण रुग्णालयासाठी त्वरित पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.

2. रुग्णांना वेळेत चाचणी अहवाल मिळावा यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात यावी.

3. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करावी.

आम आदमी पार्टीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यासाठी शासनावर दबाव टाकत असून, रुग्णांच्या हितासाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावर येत्या ७ दिवसात तातडीने कार्यवाही झाली नाही, तर पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, रितेश नगराळे, ओम पारखी, विशाल डोळस, सचिन मून व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.