• चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात वाहतोय अवैध दारूचा महापूर !
चंदनखेड्यात सर्वाधिक अवैध दारू विक्रेते?
• पोलिस व दारुबंदी उत्पादन शुल्क अधिका-यांचे होतेय दुर्लक्ष!
•पोलिस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांनी तातडीने लक्ष पुरवावे!
• तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी !
आम आदमी पार्टीने केली मागणी!
सुवर्ण भारत:किरण घाटे( विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर:भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विविध गावांमधून सातत्याने प्राप्त होत आहे.
या मुळे ग्रामीण भागात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत व त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येत आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून कौटुंबिक कलह देखील सतत वाढत आहे.
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याचे बोलल्या जात आहे.परंतु दारुबंदी उत्पादन शुल्क व पोलिसांचे या कडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे एकंदरीत दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क कार्यालय, वरोरा येथे निरीक्षकांना निवेदन सादर केले.
या निवेदनात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदरहु अवैध दारू विक्री कडे चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जातीने लक्ष पूरवून अवैध दारू विक्रेत्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आता जनतेतून होवू लागली आहे .
भद्रावती तालुक्यात चंदनखेडा हे सर्वात मोठे अवैध दारू विक्रीचे केंद्र असल्याचे स्थानिक जनतेचे म्हणणे आहे.
आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाच्या या आहेत प्रमुख मागण्या!
भद्रावती तालुक्यातील अवैध दारू विक्री दुकाणांवर त्वरित धाडी टाकाव्यात
बेकायदेशीर दारु अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष पथक पोलिस प्रशासनाने तयार करावे.
उपरोक्त मागण्या त्वरित पूर्ण झाल्या नाहीत तर आम आदमी पार्टी नागरिकांना सोबत घेवून लवकरच तीव्र आंदोलन करेल असा इशारा आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देते वेळी आम आदमी पार्टी युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, ओम पारखी, सुशांत दादा रायपूरे, लक्की निखाडे, राकेश कोवे, सौरव बेताल व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.