Home Breaking News • साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कारांचे वितरण • रामदास कामडी,हरी मेश्राम,शुभम...

• साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कारांचे वितरण • रामदास कामडी,हरी मेश्राम,शुभम पसारकर,डॉ.सुशांत इंदूरकर यांना पुरस्कार प्रदान

109

• साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कारांचे वितरण

• रामदास कामडी,हरी मेश्राम,शुभम पसारकर,डॉ.सुशांत इंदूरकर यांना पुरस्कार प्रदान

सुवर्ण भारत:गुणवंत चटपकार
तालुका प्रतिनिधी, चिमूर

स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निरालस कार्यकर्त्यांना आज रविवार, दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात सामाजिक चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे होते.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष पाटील,सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पिसे,धम्मचारी पद्मरत्न, मारोतराव अतकरे, तुळशीराम महल्ले उपस्थित होते.

साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाहुण्यांचे हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले.यात प्रामुख्याने सामाजिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांसाठी ‘संडे स्कूल’ची संकल्पना राबविणारे सामाजिक कार्यकर्ते समता सैनिक दलाचे हरी मेश्राम,ओबीसींमध्ये जनजागृतीचे कार्य करणारे आणि मूकबधिर विद्यार्थ्यांची शाळा चालविणारे रामदास कामडी,मतीमंदांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे शुभम पसारकर,आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देणारे डॉ.सुशांत इंदूरकर यांना सामाजिक चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण समारंभाला सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन कैलाश बोरकर यांनी तर आभार रावन शेरकुरे यांनी मानले.पुरस्कार वितरण समारंभाकरिता राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,शिक्षक भारती,छात्र भारती तथा मूकबधिर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.