पूनम लांबट यांना पीएचडी प्रदान
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा: तालुक्यातील बोर्डा येथील पोहाणे लेआउट रहिवासी पूनम मधुकर लांबट यांनी नुकतीच आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर येथे आयोजित ११२ व्या दीक्षांत समारंभात पूनम लांबट यांना गणित विषयासाठी पीएचडी प्रदान करण्यात आली. “सम इन इन्वेस्टीगेशन अलटलोटिव्ह थेरीज ऑफ ग्रविटेशन” हा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
नागपूरच्या शिवाजी सायन्स महाविद्यालयाचे गणित विषयाचे प्राध्यापक डॉ. अशोक पुंड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली. सध्या त्या नागपूर येथील तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे गणित विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
पूनम लांबट यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. अशोक पुंड, डॉ. सुभाष ताडे, वडील मधुकर लांबट, आई आशा लांबट तसेच कुटुंबीय आणि मित्र परिवाराला दिले आहे.
