Home Breaking News • भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष शंभरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

• भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष शंभरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

124

• भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्ष शंभरावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

सुवर्ण भारत:राजेश येसेकर
तालुका प्रतिनिधी, बल्लारपूर

भद्रावती : भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिल चंद्रपूरच्या वतीने शहिद हुतात्मा स्मारक भद्रावती येथे नुकताच शंभरावा शताब्दी वर्ष वर्धापन दिन एक दिवसीय विविध कार्यक्रमांनी आयोजिय करण्यात आला होता
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपुर उत्तरप्रदेश येथे झाली बलिदानाची व अविरत संघर्षाची गौरवशाली परंपरा लाभलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष 26 डिसेंबर 2024 रोजी 99 वर्ष पूर्ण करून शंभर व्या वर्षात पदार्पण करीत आहे. शताब्दी वर्षात संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम पक्षाचा लाल झेंडा कॉम्रेड प्रा . नामदेव कन्नाके जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते ( ध्वजारोहन ) फडकवून सलामी व घोषणा देण्यात आल्या
ढोल ताशे नगारा आतिषबाजी कला नृत्य सादर करून मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. त्या नंतर कॉम्रेड कार्ल मार्क्स कॉम्रेड
ऐगल्स कॉम्रेड लेनिन कॉम्रेड भगतसिंग कॉम्रेड सुखदेव कॉम्रेड चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेला माल्यारपण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कर्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा क पा चंद्रपूरया  कार्यक्रमाचे उदघाटन कॉम्रेड रवींद्र उमाटे म रा कार्यकारणी सदस्य चंद्रपूर यांनी केले

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भद्रावती हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भा क पा चंद्रपूर कॉम्रेड रवींद्र उमाटे म रा कार्यकारणी सदस्य भा क पा चंद्रपूर कॉम्रेड प्रा नामदेव कन्नाके जिल्हा सचिव मंडळ सदस्य चंद्रपूर कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भा क पा भद्रावती कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य भा क पा भद्रावती कॉम्रेड दत्ता कोंबे अध्यक्ष संयुक्त खदान मजदूर संघ ( आयटक ) माजरी एरिया भद्रावती, श्री क का पावडे अध्यक्ष औद्योगिक खंड विकास शहरी व ग्रामीण कारागीर संस्था ( खादी ग्रामोद्योग ) भद्रावती दिलीप ठेंगे सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक भद्रावती, विनायक येसेकर सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष भद्रावती पत्रकार असोशियन भद्रावती, पुंडलिक गोटे सामाजिक कार्यकर्ते व वेगळा विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी चंद्रपूर इत्यादी मान्यवर मंच्यावर उपस्तिथ होते
पाहुण्यांचे पुष्पमालेने मंच्यावर बसलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच पक्षात कामकरणाऱ्या आयटक मध्ये कामकरणारे संयुक्त खदान मजदूर संघ ( ड ब्लु सी यल ) बांधकामगार संघटना शालेय पोषण आहार आशा व गट प्रवर्तक अंगणवाडी – बालवाडी मध्ये काम करणारे व पत्रकार साहित्यिक लेखक कवी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात वकील डॉक्टर क्रीडा क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला
व नंतर प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन कॉ शाया मोहितकर यांनी केले.

प्रास्ताविक कॉ नसरीन पठाण यांनी केले.
व आभारप्रदशन कॉ नितीन कावटी, यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता कॉ वंदना गैनवार,कॉ लता नन्नावरे कॉ आशा सोपानकर कॉ शेख खुर्शीद, कॉ मगरे बाई, कॉ शकील शेख कॉ नानी बोबडे, कॉ सुरेखा टोंगे, कॉ बंडू टोंगे कॉ सुनीता मेहर, कॉ सुभद्रा मेश्राम, कॉ अर्चना
असूटकर, कॉ आशा झाडे, कॉ पदमवीर यादव कॉ वामन मेश्राम कॉ सुभाष समर्थ इत्यादीनी अथक परीश्रम घेतले व सुरुची भोजणांनी कार्यक्रमाची सांगता झाली यात शेकडो पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते पुरुष स्त्री उपस्थित होते.