Home Breaking News हंसराज अहीर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी भेट व चर्चा

हंसराज अहीर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी भेट व चर्चा

117

हंसराज अहीर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी भेट व चर्चा

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोककल्याण मार्गावरील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेवून त्यांचेशी विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या वतीने मागासवर्गीयांच्या हिताशी निगडीत कार्याची माहिती दिली.

दि. ०२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदीजी यांची भेट घेवून हंसराज अहीर यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून देशातील मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हिताशी निगडीत होत असलेल्या कार्याबाबतही त्यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. यावेळी अन्य बाबींवरही चर्चा करून मा. पंतप्रधान महोदयांचे मार्गदर्शन घेतले.