Home Breaking News • पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची शहीद अक्षय निकुरे यांच्या...

• पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची शहीद अक्षय निकुरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

81

• पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची शहीद अक्षय निकुरे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर- देशाचे पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जम्मु येथील पुंच्छमध्ये २४ डिसेंबरला वीरगती प्राप्त झालेल्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव निवासी शहीद अक्षय निकुरे यांच्या निवासस्थानी दि. ०४ जानेवारी २०२५ रोजी भेट देवून शहीद अक्षय निकुरे यांच्या प्रतिमेस श्रध्दांजली वाहून शोकसंतप्त कुटूंबियांची भेट घेतली व सांत्वन केले.

यावेळी भाजप नेते रमेश राजुरकर, डॉ भगवान गायकवाड, सुरेश महाजन, धनंजय पिंपळशेंडे, कृउबा समितीचे संचालक विलास झिले, पंचायत समितीच्या माजी सदस्य वंदना दाते, शहीद अक्षयचे वडील दिगंबर निकुरे, आई चांदिकाबाई निकुरे, अभय आसुटकर, शरद नक्षिणे, संजय बदबरवे, संजय घरत, धिरज दारूंडे, विलास झिले, राहुल दडमल व पिंपळगाव येथील नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी हंसराज अहीर यांनी शहीद अक्षय यांनी देशाकरिता दिलेल्या योगदानाचे नेहमीच स्मरण राहील असे सांगितले. शहीद अक्षय यांच्या स्मारकाची मागणी योग्य असून त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कुटूंबिय व ग्रामस्थांना दिले.