• अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या विदर्भातील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार यांचा सत्कार!
• आर्य वैश्य समाजाच्या एका गृपचा पुढाकार!
• समाजातील महिला भगिनींची मोठ्या संख्येंने उपस्थिती!
•चिमड्यालवार महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक मार्गदर्शिका!
सुवर्ण भारत : किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
समाजसेवा सोबतच साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या सावलीच्या सुपरिचित कवयित्री तथा सहज सुचलंच्या मार्गदर्शिका शैला चिमड्यालवार यांचा नुकताच सावली नगरीत एका छोट्याखानी समारंभात शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम वैश्य समाज महिला गृप तर्फे आयोजित करण्यात होता.
आपलं भरीव प्रेम व सहकार्य यामुळेच मी साहित्य क्षेत्रात भरीव यश संपादन केले व आजही माझा प्रवास या क्षेत्रात असाच यशस्वीपणे सुरू आहे .अश्या भावनिक शब्दात सत्कारला सुपरिचित कवयित्री चिमड्यालवार यांनी उत्तर दिले.
घरगुती कामाचा व्याप सांभाळीत त्यांनी आपल्या किराणा व्यवसायाकडे देखील काळजीपूर्वक लक्ष पुरविले आहे.
एव्हढेच नाही तर त्यांनी समाजसेविका मायाताई कोसरे व जेष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे यांचा अल्पकालावधीत विश्वास संपादित करीत आजच्या घडीला त्या सहज सुचलंची एक मार्गदर्शिका म्हणून धूरा सांभाळत आहेत हे विशेष!
उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाला सावलीच्या छाया राईंचवार, माया राईंचवार, सरिता राईंचवार, किरण बंडावार, आरती ताटकोंडावार, रूपा राईंचवार, प्राजक्ता राईंचवार, माधुरी पालपत्तूवार आदिं उपस्थित होत्या.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आर्य वैश्य समाज तर्फे समाजाच्या एका ग्रुपचा मकर संक्रातीसण साजरा करण्यात आला. याच निमित्ताने “हळदी कुंकू” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी विविध खेळ व मनोरंजन कार्यक्रम पार पडले. महिला भगिनींनी संध्याकाळी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.




