Home Breaking News • उद्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण

• उद्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण

247

• उद्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान, चंद्रपूरच्या तर्फे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने सामाजिक संस्थेला किंवा व्यक्तीला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

यावर्षी प्रथम पुरस्कार वृत्तपत्रांमधून उत्कृष्ठ लिखाण करून चंद्रपूर शहराची जीनववाहिणी असलेल्या इरई व झरपट नदीच्या संवर्धन, संरक्षणासाठी जनजागृती केल्याबद्दल वार्ताहारांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने गौरवान्वित येत आहे.

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती सन्मानचिन्ह, १ लाख ११,१११ रोख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर द्वितीय पुरस्कार जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती सन्मान चिन्ह, ५१,१११ रूपये, सन्मान प्रमाणपत्र व पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

२६ जानेवारीला सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आयोजित सोहळ्यात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे, असे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानचे राहुल पुगलिया यांनी कळविले आहे.