विवेकानंद महाविद्यालयाचे रासेयो विशेष शिबिर 28 जानेवारीला
भद्रावती/ प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तालुक्यातील मोरवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले आहे. डिजिटल भारत आणि युवक या संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उद्घाटनासाठी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान उपस्थित राहणार आहेत. वरोरा -भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे सचिव अमन टेमुर्डे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे, शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र यादव, प्रसिद्ध चित्रकार प्रल्हाद ठक,सरपंच शंकर रासेकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. सात दिवसीय या शिबिरात विविध बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यात डिजिटल मार्केटिंग फसवणूक व ग्राहक पंचायत या विषयावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूरचे सदस्य प्रवीण चिमूरकर व अध्यक्ष वामन नामपल्लीवार, संविधान व महिला सक्षमीकरण या विषयावर ॲड. अमोल बावणे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी 31 तारखेला ग्रामगीताचार्य रवी पचारे ग्रामगीता व ग्रामीण ग्रामोन्नती या विषयावर मार्गदर्शन करतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र विवेकानंद महाविद्यालयातील केंद्र संयोजक डॉ. यशवंत घुमे हे ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करतील. शनिवारी 1 तारखेला सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता दिलीप ढोक जल साक्षरता व जलसंवर्धन, यासोबतच शेतकरी उत्पादक कंपनी वरोरा चे संचालक बालाजी धोबे आणि यशवंत सायरे हे कृषी उद्योग संधी आणि आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतील. रविवारी 2 तारखेला रक्तक्षय कारणे व उपाय या विषयावर शल्यचिकित्सक डॉ. विजय चांडक, ऑनलाईन कृषी विषयक योजना व कृषी जागृती या विषयावर कृषी अधिकारी विकास चवले, ग्राम व वन हक्क या विषयावर पर्यावरण मित्र संस्थेचे शंकर भरडे, सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे मार्गदर्शन करतील. शेवटच्या दिवशी 3 फेब्रुवारीला या शिबिराचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे उपाध्यक्ष जयंत मोरेश्वर टेमुर्डे असतील. प्रमुख मार्गदर्शक डॉ. खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन काकडे, प्रा. धनराज आस्वले, सरपंच एकनाथ घागी, मनीषा रोडे उपस्थित राहतील. या शिबिराचा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयवंत काकडे, डॉ. रमेश पारेलवार, डॉ गजानन खामनकर, प्रा.संगिता बांबोडे, संजय तामगाडगे, सरपंच कवडू भोगेकर, ग्राम विकास अधिकारी रावसाहेब बोधनकर, मुख्याध्यापक श्रीराम उपासे, उषा भुसारी, राजू जिवतोडे, प्रकाश श्रीरामे, धर्माजी बोथले, प्रवीण भोगेकर यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, ग्राम शिक्षण समिती, तंटामुक्त समिती, सेवा सहकारी संस्था, गुरुदेव सेवा मंडळ, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व समस्त गावकरी प्रयत्न करत आहे.
