• प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान प्रथम पुरस्कार वृत्तपत्रांच्या जिल्हा प्रतिनिधींना तसेच व्दितीय पुरस्कार श्रीमती निलीमा मंडपे यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने सामाजिक तथा सांस्कृतिक बांधिलकी जोपासणा-या व सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून समाजाला सेवा देणा-या संस्थेला किंवा व्यक्तीला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देण्यात येतो.
मागील काही गतवर्षी हा पुरस्कार किल्ले संवर्धन, पर्यावरण या क्षेत्रात काम करणारे बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात ई-कोप्रो या संस्थेला तसेच बेवारस असणा-या प्राणिमात्राला आरोग्य सेवा देणारे देवेंद्र रापेल्ली यांच्या नेतृत्वात प्यार फाऊंडेशन या संस्थेला व गोरक्षण मध्ये अपंग वृध्द गायांची सेवा, त्यांच्या खाण्या-पिण्याचे, औषधीचे संपूर्ण काळजी घेत असलेल्या उज्जवल गौरक्षण संस्था लोहारा या संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव चकनलवार यांच्या नेतृत्वात काम करण्या-या सहका-यांना हा पुरस्कार देण्यात आला. मागील सन २०२४ ला मानवतेच्या दुष्टीने काम करणारे मृत्यूनंतर व्यक्तीचा प्रवास सुखाचा व्हावा, स्वच्छ आणि पवित्र वातावरणात अंतिम संस्कार व्हावेत या भावनेने काम करीत असलेले चंद्रपूरातील शांतीधाम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार व त्यांच्या सहका-यांना यांच्या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला.
दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी चंद्रपूर येथिल राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून इंदिार गांधी गार्डन स्कुलचे बैंड पथकासह मानवंदना देण्यात आली. या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया व प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री तथा आमदार सुधिर मुनगंटीवार, युवा नेते राहुलबाबू पुगलिया, कु. प्रियंका पुगलिया, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती निलिमा मंडपे, अँड. अविनाश ठावरी, भूपेंद्र प्रसाद, अशोक नागापूरे, देवेंद्र बेले, डॉ. मंगेश गुलवाडे, है. वृत्तपत्रांचे जिल्हा प्रतिनिधी संजय रामगिरवार , रविंद्र जुनारकर, महेंद्र ठेमस्कर, योगेश चिंदालोरे, पंकज मोहरीर, अरूण सहाय, प्रमोद उंदीरवाडे, मजहर अली, मुन्ना खेडकर, मंचावर उपस्थित होते.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान चंद्रपूरच्या वतीने प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी विशेष सेवा २०२५ चा प्रथम पुरस्कार वृत्तपत्रांमधून उत्कृष्ठ लिखान करून चंद्रपूर शहराची जीवनवाहीनी असलेली इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणासाठी तसेच ईतर विकासात्मक प्रकल्प जनतेमध्ये जनजागृती केल्याबद्दल वृत्तपत्रांच्या जिल्हा प्रतिनिधींना माजी मंत्री तथा आमदार सुधिर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पुरस्कार राशी रु. १,११,१११/- (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये), सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवान्वित आले.
तसेच कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून निर्भिडपणे व भ्रष्ट्राचाराला आळा घालण्यासाठी धाडसी निर्णय घेतल्या बद्दल या कार्याची दखल घेवून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी विशेष सेवा व्दितीय पुरस्कार राशी रु. ५१,१११/- (ऐक्कांवन हजार एकशे अकरा रुपये) सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती निलीमा मंडपे यांना गौरवान्वित आले.
कार्याक्रमाचे अध्यक्ष नरेशबाबू पुगलिया म्हणाले की, चंद्रपूर महानगराची पंचक्रोशिची जीवनवाहीनी असलेल्या इई व झरपट नद्या प्रदूषित झाल्याची चिंता व्यक्ता करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत चंद्रपूर शहारातील इरई व झरपट नदींचे संवर्धन भिंत उभारणे, खोलीकरण व सौदर्थीकरण करण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने गांर्भियांने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
सुधिर मुनगंटीवार यांनी मार्गदर्शनात म्हटले कि, जे सामाजिक दायित्व समजून काम करतात त्यांच्या पाठिशी समाज उभा राहीला पाहिजे. या शुध्द हेतू घेवून अनेक वर्षापासून नरेशबाबू त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून समाजउपयोगी काम करणा-या संस्थेला किंवा व्यक्तीला पुरस्काराने सन्मानित करतात व त्यांच्या पाठिशी नेहमी असतात.चंद्रपूर शहारातील इरई व झरपट नदीच्या संवर्धनासाठी मी जरूर प्रयत्न करेल, या महत्वपूर्ण विषयांकडे वृत्तपत्रांमधून उत्कृष्ठ लिखान करून जनतेमध्ये जनजागृती केल्याबद्दल वृत्तपत्रांच्या जनप्रतिनिधींना पुरस्कार देवून सन्मानित केले. यासाठी मी यांचे सुध्दा अभिनंदन करतो. यांच्या कार्याची दखल घेवून आज यांना आपण सत्कार करतो. त्यांचा गौरव करतो. मी नरेशबाबूजीचे कौतुक करेल, अभिनंदन करेल. दर वर्षी मला या पुरस्कार सोहळ्याला आमंत्रित करता व सहज पणे एखादे विकासात्मक काम सांगुन देतात. त्यांनी सांगितलेल्या कामासाठी मी अतिशय गंभीर असतो कारण जे काम सांगतात ते काम अतिशय विकासाचे व समाजउपोयगी असतात. आणि मी हे काम पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रर्यत्न करतो.
या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक व संचालन अँड अविनाश ठावरी यांनी केले तर आभार प्रदर्शन देवेंद्र बेले यांनी केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी, कामगार नेते, शिक्षक, शिक्षीका व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


