Home Breaking News • राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७७ व्या स्मृति दिनानिमित्य विदर्भ किसान मजदूर...

• राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७७ व्या स्मृति दिनानिमित्य विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस तर्फे श्रध्दाजंली वाहीली.

146

• राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७७ व्या स्मृति दिनानिमित्य विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस तर्फे श्रध्दाजंली वाहीली.

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृति दिनी 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी १०.३० वाजता विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस शहर व जिल्हा चंद्रपूरच्या वतीने माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर येथील स्थानिय गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस तर्फे श्रध्दांजली कार्यक्रम पार पडला.
भारतीयांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देणारे व जगाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणा-या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज ७७ वी पुण्यतिथी निमित्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, सुधाकरसिंह गौर, रामदास वाग्दरकर, क्रिष्णंण नायर, यांनी पुष्पचक्र व मालार्पण करून श्रध्दांजली वाहीली.
तसेच विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस व सर्व फंटल ऑर्गनायझेशनच्या वतीने गांधीजीना पुष्पहार वाहून सामुहिक सलामी देण्यात आली व दोन मिनिटांचे मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तसेच पदाधिकारी व कार्यकत्यांनी “अमर रहे.. अमर रहे… महात्मा गांधीजी अमर रहे असा जयघोष केला.
याप्रसंगी अरुण बुरडकर,रतन शिलावर, अजय महाडोळे, सुरेश बोडणे,अनिल तुगीडवार, गजानन दिवसे, विनोद पिंपळशेडे, हेमंत आक्केवार, श्रीनिवास पारनंदी, अनंता हुड, बाबुलाल करूणाकर, सुभाष माथनकर, आशिष महतो, पृथ्वी जगंम, सुनिल बावणे यादव शंभरकर अनुप संधु शंकर महाकाली, विनोद महतो, सतीश विजलपूरे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.