• पद्मशाली समाजाकडून श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची जयंती साजरी
सुवर्ण भारत:ब्रम्हपुरी प्रतिनिधी
ब्रम्हपुरी:पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची जयंती दि.०१फरवारी २०२५रोजी शनिवार ला ठिक दुपारी १. ०० वा.शिव मंदिर गुजरी वार्ड ब्रह्मपुरी येथे शिव अभिषेक आणि पुजा पद्मशाली समाज ब्रम्हपुरी तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
समाजाबांधव व भगिनी तर्फे श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. महिला मंडळी यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी समाजाचे महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजना साठी पंडित प्रमोद बोकडे,माजी सैनिक कैलास बैरवार, मुरली अडेटवार, विनोद पेदुलवार, संतोष सिलवेरी, रवि चामलवार, राकेश बंडेवार, सुधाकर पेदुलवार, विनल बंडेवार,सागर बल्लेवार, रवि रापेल्लीवार, तसेच महिला मंडळी रजनी भा. चामलवार, जान्हवी र. चामलवार,रसना मु. बोधनवार, प्रतीक्षा अडेटवार, स्वाती स. सिलवेरी, मीना पेदुलवार, माधुरी पेदुलवार यांनी अथक परिश्रम घेतले.