खुंटेफळ साठवन तलाव (१९१ ) हेक्टर जमीन धारकांना सानुग्रह अनुदान हेक्टरी २८ लाख रू मिळवून द्या– प्रदीप थोरवे
सुवर्ण भारत :गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा आष्टी तालुक्यात येत असल्याने ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असुन , मुख्यमंत्री साहेबांकडून आदरणीय आमदार सुरेश (आण्णा) धस साहेबांनी खुंटेफळ साठवण तलावासाठी सन २०१३ पूर्वी संपादित करण्यात आलेल्या (१९१ ) हेक्टर जमीनधारकांना (५४ कोटी) सानुग्रह अनुदान व (हेक्टरी २८ लाख रु) मिळऊन द्यावे , अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन मंत्री प्रदिप थोरवे यांनी निवेदनाद्वारे केल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे आहे .
पुढे सांगितले की , कृष्णा भिमा स्थिरीकरण योजने अंतर्गत खुंटेफळ (पुंडी) ता.आष्टी, जि.बीड. येथे साठवण तलावाचे बोगदा भूमिपूजन आणि पाइपलाइन पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ५ तारखेला येत आहेत . ह्या तलावाचे कामकाज जवळपास १४ वर्षापूर्वी सुरू झाले असून , मधे काही वर्ष काम बंद होते , तसेच तलावासाठी खुंटेफळ/पुंडी /सोलापुरवाडी या गावांतील जमीनी शासनाला साठवन तलावासाठी खरेदी दिल्या आहेत . ज्या शेतकर्यांनी साठवण तलावासाठी सर्वात आधी २०१३ पुर्वी शासनास जमिन दिलेली आहे , त्यांची जमिन शासनाने ७ लाख रु हेक्टर ने घेतलेली आहे . व सध्या राहीलेल्या शेतकर्यांची जमीन ३५ लाख रु हेक्टर ने घेन्यात येत असल्याने , शासनाने आधीच्या शेतकर्यांना सानुग्रह अनुदान तथा भावनीक रक्कम फरक म्हनुन २८ लाख रु प्रती हेक्टरी देन्यात यावी . या शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देन्यासाठी शासनाला अंदाजे फक्त ५४ कोटी रु अतिरिक्त द्यावे लागतील . एकाच प्रकल्पासाठी आधीच्या गोरगरीब शेतकर्यांना शासनाकडून वेगळा न्याय व आताच्या शेतकर्यांना वेगळा न्याय भेटत असल्याने सरकार याकडे पुर्णपने दुर्लक्ष करीत आहे , ही अत्यंत खेदाची बाब असल्याने नवनिर्वाचित आमदार सुरेश (अण्णा) धस साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा , अशी विनंती आप चे संघटन मंत्री प्रदिप थोरवे यांनी आ.सुरेश धस यांच्यासमोर आपल्या भाषणात केली असून , निवेदनही दिले असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आम आदमी पार्टी युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन मंत्री प्रदीप थोरवे यांनी सांगितले आहे